Maharashtra Budget 2022: मविआ सरकारचा अर्थसंकल्प सादर, वाचा महत्वाच्या तरतुदी
Maharashtra Budget 2022 | मुंबई: महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसंभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासाबाबत काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील बैल-घोडा पशुवैद्यकीय महाविद्यालय 60 ते 120 वर्षे जुन्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी 2022-23 या वर्षांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आरोग्य;
1) 8 कोटी 74 लाख व्यक्तींना पहिला डोस
2) पुढील तीन वर्षांसाठी 11,300 हजार कोटी प्रस्तावित.
3) 60 रुग्णालयात फेको योजना
4) 8 मोबाईल वाहने 8 कोटीतून दिली जाणार आहे.
5) टाटा कर्करोग रुग्णालयाला जमीन दिली जाणार आहे.
दळणवळण:
1) समृद्धी महामार्ग 77 टक्के काम पूर्ण
अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार
2) मुंबईत रस, रेल्वे ताण कमी करण्यासाठी जलमार्गाने जोडणार त्यासाठी 330 कोटी खर्च अपेक्षित सर्वसामान्यांना परवडणारे दर ठरविण्यात येणार आहे.
3) मुंबई मेट्रो 3 च्या मार्गाचा विस्तार होणार आहे.
4) बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक
5) शिवडी-न्हावा शिवा 64 टक्के काम पूर्ण, 2023 मध्ये पूर्ण होणार
6) शिर्डी मालवाहतुकीचा व्यवस्था केली जाणार
7) रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटी रुपये देणार
8) गडचिरोली येथे नवीन विमानतळावर उभारणार
उद्योग:
1) विद्युत वाहनांची नोंदणी 157 टक्क्यांनी वाढली आहे.
2) कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून भांडवलच्या कर्जावरील व्याजाची परतफेड करता येईल. एकूण 15 हजार 215 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.
मनुष्यबळ विकास
1) 100 कोटी रुपये निधी कालिना विद्यापीठात राखून
2) सिडनहॅम कॉलेज, एसएनडीटी, 10 कोटी रुपये निधी
3) गटारांची सफाई करण्यासाठी अत्याधुनिक स्वयंचलित मशिन्स पुरवणार
4) तृतीयपंथीयांना रेशनकार्ड, ओळखपत्र देणार
5) 1 लाख अंगणवाडी सेविकांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार
6) एसआरएसाठी म्हाडाच्या मुंबईबाहेरील झोपड्यांची मूलभूत कामे करण्यासाठी 100 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे.
कोणत्या विभागाला किती निधीची तरतूद (2022-23 या वर्षासाठी)
कृषी विभागाला 3 हजार 35 कोटी रुपये
सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाला 1 हजार 512 कोटी रुपये
गृह विभागाला 1 हजार 892 कोटी रुपये
महसुल विभागाला 347 कोटी व वन विभागाला 1 हजार 995 कोटी रुपये
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 253 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
नियोजन विभागाला 6 हजार 818 कोटी 99 लाख रुपये
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सर्वसाधारण योजनेकरीता 2 हजार 876 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरीता 12 हजार 230 कोटी असा एकूण 15 हजार 106 कोटी रुपये
इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 3 हजार 451 कोटी रुपये
आदिवासी विकास विभागाला 11 हजार 199 कोटी रुपये
महिला व बालविकास विभागाला 2 हजार 472 कोटी रुपये
ग्रामविकास विभागाला 7 हजार 718 कोटी रुपये तसेच गृहनिर्माण विभागाला 1 हजार 71 कोटी रुपये
सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी 15 हजार 673 कोटी रुपये व इमारती बांधकामासाठी 1 हजार 88 कोटी रुपये
परिवहन विभागाला 3 हजार 3 कोटी, बंदरे विकासासाठी 354 कोटी तसेच नगरविकास विभागाला 8 हजार 841 कोटी रुपये
उद्योग विभागाला 885 कोटी रुपये
ऊर्जा विभागाला 9 हजार 926 कोटी रुपये
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 3 हजार 223 कोटी रुपये
जलसंपदा विभागाला 13 हजार 552 कोटी व खारभूमी विकासासाठी 96 कोटी रुपये
रोजगार हमी योजनेसाठी सन 2022-23 मध्ये 1 हजार 754 कोटी आणि फलोत्पादनासाठी 540 कोटी रुपये
मृद व जलसंधारण विभागाला 3 हजार 533 कोटी रुपये
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाला 406 कोटी 1 लाख रुपये
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3 हजार 183 कोटी रुपये
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला 2 हजार 61 कोटी रुपये
कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाला 615 कोटी रुपये
उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 1 हजार 619 कोटी रुपये
शालेय शिक्षण विभागाला 2 हजार 354 कोटी व क्रीडा विभागाला 385 कोटी रुपये
मदत व पुनर्वसन विभागाला 467 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. शिवाय, नैसर्गिक आपत्ती मदत व इतर अनिवार्य खर्चासाठी 10 हजार 655 कोटी 73 लाख 7 हजार रुपयाची तरतुद प्रस्तावित आहे. कामगार विभागाला 125 कोटी रुपये
विधी व न्याय विभागाला 578 कोटी रुपये
पर्यटन विकासासाठी 1 हजार 704 कोटी व सांस्कृतिक कार्य विभागाला 193 कोटी रुपये
अल्पसंख्यांक विकास विभागाला 677 कोटी रुपये
मराठी भाषा विभागाला 52 कोटी, सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार 139 कोटी, माहिती तंत्रज्ञान विभागाला 702 कोटी व माहिती व जनसंपर्क विभागाला 265 कोटी रुपये
Web Title: Maharashtra Budget 2022