Home अकोले Rain: संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचे संकट

Rain: संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचे संकट

Crisis of untimely rain in Sangamner and Akole taluka

संगमनेर | Sangamner: गेल्या चार ते पाच दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं (rain) झोडपलं आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलक्या पावसासह गारपीट झालेली दिसून आली आहे. आजही राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम आहे.

संगमनेर तालुक्यातील साकुर पठारावर अवकाळी पावसाच संकट दिसत आहे. आज सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहे. विजांच्या कडकडाटासह वारे वाहत आहे. अकोले तालुक्यात देखील अवकाळी पावसाचे (Rain) संकट ओढवले आहे. सायंकाळी विजेच्या कडकडाटसह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदळ उडाली आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाचा चांगलाच तडाखा बसण्याची शक्यता आहे. या परीस्थितीमुळे शेतकरी चांगलेच धस्तावले आहे.

Web Title: Crisis of untimely rain in Sangamner and Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here