Home अहमदनगर Ahmednagar: अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला, एवढे दिवस झोपा काढल्या काय?

Ahmednagar: अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला, एवढे दिवस झोपा काढल्या काय?

Ahmednagar Ajit Pawar's indirect attack on Raj Thackeray

अहमदनगर| Ahmednagar | Kopargaon: उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यक्रमप्रसंगी भाषणादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली. अरे एवढे दिवस काय झोपा काढल्या होत्या काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

भोग्याबद्दल बोलणार्यांपैकी मागील सरकारमध्ये कोणी नव्हते का? सध्या काही लोक अशाच गोष्टी समोर आणण्याचे काम करीत आहेत.  विकासाला महत्व देण्याऐवजी वेगळी चर्चा समाजात रंगवायची, समाजात वितुष्ट कसे निर्माण होईल, दरी कशी निर्माण होईल हे पाहिलं जात आहे. भोग्याबद्दल बोलणार्यांपैकी मागील सरकारमध्ये कोणी नव्हते का? आपण किती वर्षापासून गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणाचा आदर करतोय एकमेकांना शुभेच्छा देतो. हि आपली संस्कृती आणि आपली परंपरा आहे. असे अजित पवारांनी म्हंटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. अश्या भोंग्याच्या गोष्टी करून विकास होत नाही. असही त्यांनी नमूद केलं.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील पोलीस ठाणे इमारत, बसस्थानक, पंचायत समिती इमारत तसेच शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामांचे उद्घाटन राज्याचे उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. डॉ. सुजय विखे व जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

Web Title: Ahmednagar Ajit Pawar’s indirect attack on Raj Thackeray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here