Home अकोले Ahmednagar | अकोले: विधवा वहिनीबरोबर दिराची लग्नगाठ, दीड वर्षाच्या पुतणीचे स्वीकारले पालकत्व

Ahmednagar | अकोले: विधवा वहिनीबरोबर दिराची लग्नगाठ, दीड वर्षाच्या पुतणीचे स्वीकारले पालकत्व

Ahmednagar Akole Wedding

Ahmednagar | अकोले : अकोले तालुक्यातील ढोकरी येथील तरुणाने मनाचा मोठेपणा व हिम्मत दाखवत विधवा वाहिनीबरोबर लग्नाची गाठ बांधत दीड वर्षाच्या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारले आहे. कोरोना काळात मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ वर्षीय भावजयी व दीड वर्षाची चिमुकली दुखात लोटले गेल्याने समाधान याने मनाची हिम्मत दाखवत चिमुकल्या पुतणीचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

दोनही कुटुंबियाच्या सहविचाराने त्याने भावजयीबरोबर लग्न केले आहे. म्हाळादेवी येथील खंडोबा मंदिर प्रांगणात रविवारी विवाह पार पडला. दिराने लग्न करून सामाजिक भान जपले आहे.

तालुक्यातील ढोकरी येथील निलेश कारभारी शेटे वय ३१ यांचे १४ ऑगस्ट २०२१ ला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. ते जव्हार येथे आश्रम शाळेत नोकरीस होते. आश्रम शाळेत करोनाने प्रवेश केल्याने मुले शिक्षक बाधित झाले. यामध्ये निलेश याला कोरोनाची बाधा झाली. कोरोनातून सावरत असताना मेंदूत गाठ झाल्याने नाशिक येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी पूनम व दीड वर्षीय चिमुकली दुखात लोटले गेले. या अपघातातून सावरण्यासाठी घरातील समाधान कारभारी शेटे या २६ वर्षीय तरुणाने वाहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चुलते, कुटुंबीय, माहेरकडील पाहुणे यांच्या सहविचाराने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी विवाह पार पडला.

Web Title: Ahmednagar Akole Dira’s marriage with his widowed daughter-in-law 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here