Home अहमदनगर अल्पवयीन मुलीस त्रास देणाऱ्या तरुणास अटक

अल्पवयीन मुलीस त्रास देणाऱ्या तरुणास अटक

Ahmednagar Arrested for harassing a minor girl

अहमदनगर | Ahmednagar: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह करत आत्महत्येची धमकी देणाऱ्या तरुणाला रविवारी भिंगार येथील पोलिसांनी अटक केली आहे.

वैभव विजय औटी रा.माळीचिंचोरे ता. नेवासा असे या तरुणाचे नाव आहे.  भिंगार पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वैभव औटी हा गेल्या दिवसांपासून पाठलाग करीत आहे. आपण लग्न करू असा आग्रह तो करीत होता.

रविवारी औटी याने घरी येऊन माझ्याशी लग्न कर असे तिला म्हणाला, मुलीने नकार दिल्याने मुलीच्या आईच्या मोबाईलवर आत्महत्या करण्याचा मेसज टाकून दम दिला. याप्रकरणी सदर मुलीने रविवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून औटी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस नाईक राजू सुन्द्रिक, शेख यांच्या पथकाने रविवारी या आरोपीला अटक केली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Suicide from a street dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here