Home अहमदनगर नगर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या या तालुक्यांतील अहवालांची प्रतीक्षा

नगर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या या तालुक्यांतील अहवालांची प्रतीक्षा

Ahmednagar Awaiting reports from abroad in these talukas

अहमदनगर | Ahmednagar:  कोरोनाचा नवीन व्हायरस ऑमिक्रॉनच्या शोध मोहिमेत जिल्ह्यात मंगळवार (दि.7) रोजी आणखी 55 व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यांची यादी आरोग्य विभागाला प्राप्त झाली असून या सर्वांचा शोध घेऊन आता त्यांची करोनाची चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 65 अहवालांची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यात 3 तारखेला 15, 5 तारखेला 12 आणि काल 55 जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करून जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. या सर्वांची यादी राज्य पातळीवरून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झालेली आहे. यातील 25 जणांचा ठावठिकाणी लागला असून 55 जणांची शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाने 25 जणांचे नमुने घेतलेले असून यात 15 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तर 65 अहवाल प्रतीक्षेत  असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

अहवालाची प्रतिक्षा

अकोले 7, कोपरगाव 5, राहाता 11, राहुरी 4, संगमनेर 4, संगमनेर 3, श्रीरामपूर 10, नगर मनपा 18, कर्जत 1, नेवासा 3, नगर ग्रामीण 2 आणि शेवगाव 1 यांचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar Awaiting reports from abroad in these talukas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here