Home क्राईम संगमनेरातील हद्दपार केलेले तीन आरोपी घरी आल्याने गुन्हा

संगमनेरातील हद्दपार केलेले तीन आरोपी घरी आल्याने गुन्हा

 Crime News Three accused deported from Sangamner came home

संगमनेर | Crime News:  संगमनेर तालुक्यातील आश्वी ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांतील ९ जणांवर गंभीर गुन्हे दाखल केल्याने त्यांना हद्दपार करण्यात आले होते. मात्र यातील तिघे घरी आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद हरोभाऊ पर्वत, प्रकाश नामदेव वाडगे, राहुल विठ्ठल वाघ (दाढ खुर्द),  शंकर सुभाष दातीर (पिंप्री लौकी), मोहसीन खान रहीम पठाण (अकोले नाका), रवींद्र पंढरीनाथ इंगळे, सुखदेव लक्षमण वाडेकर, श्रीकांत फकीरा मुन्तोडे (आश्वी बुद्रुक), गणेश बाबासाहेब कोरडे (आश्वी  खुर्द) आदिना हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीचा कालावधी पूर्ण झालेला नसताना रवींद्र पंढरीनाथ इंगळे, शरद हरिभाऊ पर्वत, शंकर सुभाष दातीर हे पोलीस गस्त घालत असताना आढळून आले. पोलीस नाईक विनोद गंभीरे , कॉन्स्टेबल वाकचौरे, पथवे यांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

Web Title: Crime News Three accused deported from Sangamner came home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here