Home अहमदनगर Ahmednagar Breaking: आरोपी बाहेत येत नसल्याने पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून अटक

Ahmednagar Breaking: आरोपी बाहेत येत नसल्याने पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून अटक

Ahmednagar Breaking broke down the door of the bungalow and arrested him 

अहमदनगर | Ahmednagar Breaking: बुधवारी सकाळी सात वाजता भिंगार परिसरात स्वामी रेसिडेन्सी या घरावर एका दरोड्याच्या गुन्ह्यातील अटक करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा आला. मात्र या गोष्टीसंदर्भात आरोपीला कूनकून लागल्याने संबंधीत आरोपीने बंगल्याचे दरवाजे लावून तो घरात बसला. शेवटी आठ तासांनी पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून त्याला अटक करण्यात आली.

लॉरेन्स स्वामी असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीविरुद्ध भिंगार पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. पोलीस स्वामी याला त्याच्या बंगल्यासमोर उभे राहून बाहेर येण्याचे आवाहन करीत असताना तो अटकपूर्व जामिनासाठी घरबसल्या सूत्रे हालवीत होता.

तो न्यायालयातून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होता. पोलीस लाउडस्पीकरवर बाहेर येण्याचे आवाहन करीत होते. मात्र तो बाहेर आला नाही. शेवटी पोलिसांनी दरवाजा तोडून त्यास अटक केली. पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे याच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Ahmednagar Breaking broke down the door of the bungalow and arrested him 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here