Home संगमनेर Indorikar Maharaj: इंदोरीकर महाराजांच्या सुनावणीला तारीख पे तारीख

Indorikar Maharaj: इंदोरीकर महाराजांच्या सुनावणीला तारीख पे तारीख

Date of the hearing of Indorikar Maharaj

संगमनेर | Indorikar Maharaj: प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर संगमनेर सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्यात नवीन सरकारी वकील अरविंद राठोड यांची नियुक्ती झाली आहे.

या खटल्याची तारीख ८ डिसेंबरला होणार होती. मात्र कोर्टच रजेवर असल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही. ती आज ९ डिसेंबर झाली असून त्यांना पुढील तारीख १६ डिसेंबर देण्यात आली आहे.

सरकारी वकिलांनी खटल्या संदर्भात कोर्टात दाखल केलेली कागदपत्रे अपिलाच्या कामी बोलाविण्यात यावे असा कोर्टाने हुकुम केला आहे. इंदोरीकर महाराजांच्या वकिलांनी प्रमाणित कागदपत्रे जिल्हा न्यायालयात दाखल करावे असा आदेश देण्यात आला आहे. सरकारी वकील अरविंद राठोड या खटल्याची तपासणी करणार आहेत. संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागा मार्फत इंदोरीकर महाराजांच्या विरोधात ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे वकील रंजना गवांदे बाजू मांडत आहेत तर इंदोरीकर महाराज यांच्यातर्फे वकील के. डी. धुमाळ हे बाजू मांडण्याचे काम करीत आहेत.

Web Title: Date of the hearing of Indorikar Maharaj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here