Home अहमदनगर Theft: कारची काच फोडून रोख रक्कम व कागदपत्रे चोरीस

Theft: कारची काच फोडून रोख रक्कम व कागदपत्रे चोरीस

Ahmednagar Breaking car glass and Theft cash and documents

अहमदनगर | Ahmednagar Theft: अहमदनगर जिल्ह्यात चोरट्यांचा भरदिवसा सूळसुळाट सुटला आहे. रुग्णालयाच्या आवारात उभी केलेल्या कारची काच फोडून ३० हजार रुपये रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे चोरट्यांनी चोरून (Theft) नेल्याची घटना शहरातील करंदीकर रुग्णालयाच्या आवारात शनिवारी सकाळी आठ ते साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.

राहुल शिवाजी वाकळे वय ३० रा. कौठ बुद्रुक ता. संगमनेर हल्ली रा. करंदीकर रुग्णालय यांनी रुग्णालयाच्या आवारात कार उभी केली होती. चोरट्यांनी या कारचा दरवाज्याची काच फोडून आतमधील ३० हजार रुपयांची रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे चोरून नेले आहेत. याबाबत वाकळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक योगेश चव्हाण  हे पुढील तपास करीत आहे. दरम्यान कारच्या काचा फोडून पैसे चोरीला जाण्याच्या घटना घडत असून चालकाने याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.

Web Title: Ahmednagar Breaking car glass and Theft cash and documents

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here