Home अहमदनगर पोलीस भरती पेपर लीक: बहाद्दराने चपलेत मोबाईल लपवत व्हॉट्सअॅप ग्रुपवर पेपर लीक

पोलीस भरती पेपर लीक: बहाद्दराने चपलेत मोबाईल लपवत व्हॉट्सअॅप ग्रुपवर पेपर लीक

Crime News Ahmednagar Police Paper Break Down 

अहमदनगर |Ahmednagar Crime News: पोलीस भरतीसाठी आयोजित लेखी परीक्षेला आयफोनचा वापर करत प्रश्नपत्रिका लीक करणाऱ्या उमेदवाराला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई भरती परीक्षेत कॉपी करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.विकास परमसिंग बारवाल रा. नांदी ता. अंबड जि. जालना असे या उमेदवाराचे नाव आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याने चपलेत मोबाईल लपवून आत नेला होता.

आरोपीनं आपल्या उजव्या पायातील सॅण्डलमध्ये मोबाइल फोन आणि एक काळ्या रंगाचं डिव्हाईस लपवून ठेवलं होतं. तसेच त्याच्याकडे एक मायक्रोन देखील होता.

या तिन्ही साधनाच्या मदतीने आरोपीनं परीक्षा केंद्रातील पेपर एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला होता. ग्रुपवरील साथीदारांच्या मदतीने प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आरोपी करत होता. पण त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याची झडती घेतली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थी रेसिडेन्शियल ज्युनिअर कॉलेज परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होता. हा धक्कादायक समोर आला.

पोलिसांनी आरोपीकडून कॉपी करण्यासाठी वापरलेला मोबाइल, सॅण्डल, मायक्रोफोन आणि  अन्य एक डिव्हाईस जप्त केलं आहे. आरोपीवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा (Crime) दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Web Title: Crime News Ahmednagar Police Paper Break Down 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here