Home अहमदनगर अहमदनगर: अवकाळी पावसाचा कहर! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर: अवकाळी पावसाचा कहर! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

Ahmednagar News: कांदा झाकण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा वीज कोसळून (lightning Strike) मृत्यू झाल्याची घटना.

Ahmednagar Child dies due to Lightning Strike

नेवासा | Nevasa:  जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच आहे. शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना नेवासा तालुक्यातील म्हसले येथे शुक्रवार (दि.२८) रोजी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास घडली. साई उर्फ बहीरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय १० वर्षे ) असे मयत मुलाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी ११:३० ते १२:१५ यावेळेत नेवासा तालुक्यात वीजच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पाऊस सुरु होण्याचे दरम्यान सकाळी १२:१५ वाजेच्या दरम्यान घराच्या सोबत शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या साई उर्फ बहीरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय १० वर्षे ) या इयत्ता ४ थी मध्ये असलेल्या शालेय विद्यार्थ्याचे अंगावर कडकडणारी वीज पडली, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.

त्याचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Ahmednagar Child dies due to Lightning Strike

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here