Home संगमनेर संगमनेरात अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान, घराचे पत्रे  उडाले

संगमनेरात अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान, घराचे पत्रे  उडाले

Sangamner News: अचानक आलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शहरात काही ठिकाणी लावलेले फ्लेक्स बोर्डदेखील पडले. शेतीचेही नुकसान झाले. जोराच्या वादळात अरगडे यांच्या घराच्या दोन्ही खोल्यांचे पत्रे उडाले.

Unseasonal rain in Sangamner, damage caused by a hailstorm, house leaves blown

संगमनेर: संगमनेर शहर आणि परिसरात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा तडाखा झाला यामध्ये काही ठिकाणी तुरळक गारा पडल्या. शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी परिसरातील अरगडे मळा येथे वादळाने घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. भाऊसाहेब सोमनाथ अरगडे यांच्या घराच्या दोन खोल्यांचे दोन पत्रे साधारण दीड हजार फुटांवर जाऊन पडले. घरातच विटा पडल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

दुपारी अचानक अवकाळी पाऊस झाला. शहरात काही ठिकाणी लावलेले फ्लेक्स बोर्डदेखील पडले. शेतीचेही नुकसान झाले.  जोराच्या वादळात अरगडे यांच्या घराच्या दोन्ही खोल्यांचे पत्रे उडाले, घरातच विटा पडल्या. सुदैवाने तेथे कुणी नव्हते. अरगडे यांच्या संसारोपयोगी साहित्यांचे व घरातील इतरही वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. गुंजाळवाडी गावचे तलाठी गणेश शिंदे, ग्रामसेवक भरत आहेर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. साधारण अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी शिंदे यांनी दिली.

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे संगमनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आणि तातडीने पंचनामे करण्यासाठी संगमनेर तालुक्याचे प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर यांनी तालुक्यातील सर्वच गावच्या तलाठ्यांना निर्देश दिले आहेत. झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे प्रभारी तहसीलदार तळेकर यांनी सांगितले.

Web Title: Unseasonal rain in Sangamner, damage caused by a hailstorm, house leaves blown

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here