Home संगमनेर संगमनेर बाजार समिती निवडणूक: थोरात विरुद्ध विखे, 97 टक्के मतदान, आज मतमोजणी

संगमनेर बाजार समिती निवडणूक: थोरात विरुद्ध विखे, 97 टक्के मतदान, आज मतमोजणी

Sangamner Bajar Samiti Election:  आमदार बाळासाहेब थोरात यांचे शेतकरी विकास मंडळ तर महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे जनसेवा मंडळ या दोन्ही पॅनलमध्ये मुख्य लढत.

Sangamner Bajar Samiti Election

संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे शेतकरी विकास मंडळ तर महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे जनसेवा मंडळ या दोन्ही पॅनलमध्ये मुख्य लढत होत आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

शनिवारी (दि. २९) मतमोजणी होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल हाती येतील. जनता नगर येथील राजमाता जिजाऊ प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवर आज मतमोजणी होणार आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी १८ जागांसाठी ९७. १२ टक्के मतदान झाले. एकूण ३ हजार ६१४ मतदारांपैकी ३ हजार ५१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

आधी येथील बाजार समितीवर माजी मंत्री आमदार थोरात यांचे वर्चस्व होते; परंतु यंदाच्या निवडणुकीत महसूलमंत्री विखे यांचेही पॅनल असल्याने आता बाजार समितीत कोण वर्चस्व सिद्ध करणार अशीच चर्चा आता सुरू असून संपूर्ण तालुक्याला निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title: Sangamner Bajar Samiti Election

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here