Home अहमदनगर अहमदनगर: म्हशी चारत असताना शेतकरी उंबराच्या झाडाखाली बसले अन घात झाला

अहमदनगर: म्हशी चारत असताना शेतकरी उंबराच्या झाडाखाली बसले अन घात झाला

Ahmednagar News: दिघोळ येथे उंबराच्या झाडाखाली बसलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू.

A farmer who was sitting under an umber tree died due to a lightning Strike

जामखेड: शुक्रवारी सकाळी  साडेअकराच्या सुमारास जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे उंबराच्या झाडावर वीज कोसळली. या झाडाखाली बसलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसही झाला. यामध्ये खर्डासह परिसरातील घरावरील पत्रे उडून गेले. शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले.

भीमराव बाजीराव दगडे (वय ६५, रा. दिघोळ, मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे सकाळी ११:३० च्या सुमारास अचानक वादळासह पाऊस सुरू झाला. दिघोळ शिवारात भीमराव दगडे म्हशी चारत होते. अचानक पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाल्याने दगडे हे उंबराच्या झाडाखाली बसले. त्यावेळी उंबराच्या झाडावर वीज पडली. त्यातच भीमराव दगडे यांचा मृत्यू झाला.

ही घटना समजताच दिघोळचे सरपंच नानासाहेब गिते यांनी दगडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला. खर्डा पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: A farmer who was sitting under an umber tree died due to a lightning Strike

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here