Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यावर इतके दिवस अवकाळी पावसाचे संकट

अहमदनगर जिल्ह्यावर इतके दिवस अवकाळी पावसाचे संकट

Ahmednagar News:  भारतीय हवामान खात्याचा अंदाज, पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जाेरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा.

Ahmednagar district is suffering from unseasonal rain for so long

अहमदनगर: जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार  वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात (ता. २८) ते २ मेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस हाेणार असल्याचे हवामान खात्याने भाकित वर्तवले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा.

विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

Web Title: Ahmednagar district is suffering from unseasonal rain for so long

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here