Home पुणे धक्कादायक! भिकारी महिलेवर बलात्कार; चौघांविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! भिकारी महिलेवर बलात्कार; चौघांविरुद्ध गुन्हा

Pune Crime: पुण्यात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे.

rape of a beggar woman Crime against four

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना सर्वाधिक आहेत. अशीच एक बलात्काराची घटना पुण्यातील येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फुलेनगर परिसरात घडली.

याबाबत एका ३० वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही भीक मागून उदरनिर्वाह करते. येरवड्यातील फुलेनगर परिसरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (आरटीओ) मोकळ्या मैदानावर महिला आणि तिचे कुटुंबीय राहतात.

ही महिला रात्री पदपथावर झोपते. आरोपी हा पीडित महिलेच्या नात्यातील आहेत. परवा रात्री ही महिला आरटीओ परिसरातील मोकळ्या मैदानात गेली होती. त्या वेळी तिला आरोपीने धमकावून तिच्यावर बलात्कार केला याला त्याच्या तीन मित्रांनी मदत केली. आरोपीने या बाबत कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी देखील दिली. यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.

Web Title: rape of a beggar woman Crime against four

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here