Home अहमदनगर Ahmednagar: तलावात बुडून मुलाचा मृत्यू

Ahmednagar: तलावात बुडून मुलाचा मृत्यू

Ahmednagar Child drowns in lake

Ahmednagar News | अहमदनगर: अनाथ मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या येथील स्नेहालय संस्थेतील किशोरवयीन मुलाचा तलावात बुडून (drowns) मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Ahmednagar News)

परमेश्वर गुलाब जैद वय १५ रा. स्नेहालय नगर असे मयत मुलाचे नाव आहे. नागपूर औद्योगिक वसाहत परिसरात अनाथ मुलांसाठी स्नेहालय ही संस्था चालविण्यात येते. स्नेहालय संस्थेपासून काही अंतरावर निंबळक परिसरात पाण्याचा तलाव आहे. या तलावाच्या पाण्यात परमेश्वर बुडाल्याची माहिती मिळताच स्नेहालयातील रामदास काकडे मदतीतीस धावून गेले. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  अधिक तपास पोलीस निरीक्षक आठरे हे करीत आहे.    

Web Title: Ahmednagar Child drowns in lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here