प्रशासनाकडून २४ तास कंट्रोल रूम, बेड्स बाबत मिळणार माहिती
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता २४ तास कंट्रोल रूम कार्यान्वित केला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२४१- २३४५४६० असा आहे.
या कंट्रोल रूमसाठी नोडल अधिकारी म्हणून उप जिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांची तर सहायक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यानी दिली. नागरिकांना जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेडची माहिती मिळविण्यासाठी सदर कंट्रोल रूमशी संपर्क साधावा. हे कंट्रोल रूम २४ तास सुरु राहील असे कळविण्यात आले आहे.
Web Title: Ahmednagar Control room