Home अहमदनगर गुरुवारी नगर जिल्ह्यात संख्या वाढली तब्बल २७८ कोरोना बाधित

गुरुवारी नगर जिल्ह्यात संख्या वाढली तब्बल २७८ कोरोना बाधित

Ahmednagar Corona News Today Latest Update

अहमदनगर | Ahmednagar Corona News: गुरुवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्याच्या करोना रुग्णांच्या संख्येत २७८ ने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १००६ इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात आज १६८ रुग्ण करोनामुक्त झाले आहे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण बरे झालेले रुग्ण: ७३१११

जिल्ह्यातील उपचार सुरु असलेले रुग्ण: १००६

जिल्ह्यातील एकूण मृत्यू: ११३४

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या: ७५२५१

जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट प्रयोगशाळेत ११७, खासगी प्रयोगशाळेतून १२७ तर अँटीजेन चाचणीत ३४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट प्रयोगशाळेत ११७ यामध्ये मनपा ३५, अकोले ६, जामखेड ६, कर्जत ५, नगर ग्रामीण ९, पारनेर ८, पाथर्डी २, राहता १४, संगमनेर २०, श्रीरामपूर १०, मिलिटरी हॉस्पीटल १ इतर जिल्हा १ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेतून १२७ यामध्ये मनपा ३४, अकोले २, कर्जत ३, कोपरगाव ६, नगर ग्रामीण ४, नेवासा ५, पारनेर ११, पाथर्डी २, राहता १४, राहुरी १, संगमनेर ३३, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ४ व इतर जिल्हा ३ असे बाधित आढळून आले आहेत.

अँटीजेन चाचणीत ३४ रुग्ण बाधित यामध्ये मनपा ५, जामखेड १३, कर्जत ३, नगर ग्रामीण २, पारनेर ४, पाथर्डी १, राहता ३, राहुरी २, श्रीगोंदा १ असे बाधित आढळले आहे.

Web Title: Ahmednagar Corona News Today Latest Update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here