इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांत गुंडाळला, भारताला विजयासाठी इतक्या धावांची गरज
IND vs ENG 3rd Test day 2: भारताने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ८१ धावांत गुंडाळला आहे. भारताला विजयासाठी ३८ धावांची गरज आहे.
इंग्लंड पहिला डाव: ११२/१० (४८.४ ओवर)
भारत पहिला डाव: १४५/१० (५३.२ ओवर)
इंग्लंड दुसरा डाव: ८१/१० (३०.४ ओवर)
भारत* दुसरा डाव: ११/० (२.० ओवर)
भारताला जिकण्यासाठी आणखी ३८ रन्सची गरज आहे. भारताकडे अजून १० विकेटस हातात असून भारतीय फलंदाज खेळत आहे. रोहित शर्मा ६ रन्स वर तर शुभमन गिल १ रन्सवर खेळत आहे.
दरम्यान भारताने पहिल्या डावात १४५ रन्स केल्या यात ३३ धावांची भारताने आघाडी घेतली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारताच्या पाच विकेटस घेतल्या. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पहिली विकेट शून्यावर गेली. अक्षरने पहिल्या तीन चेंडूत दोन विकेटस घेतल्या.
अपडेट: तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० गडी राखून विजय मिळविला आहे.
Web Title: IND vs ENG 3rd Test day 2