Home महाराष्ट्र चित्रा वाघ संतापल्या: लाज वाटली पाहिजे तुम्हाला, पोलीस रक्षक आहेत की भक्षक

चित्रा वाघ संतापल्या: लाज वाटली पाहिजे तुम्हाला, पोलीस रक्षक आहेत की भक्षक

Chitra Wagh got angry You should be ashamed

पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप प्रचंड आक्रमक झाली असून चित्रा वाघ या  आज वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाज वाटली पाहिजे अशा शब्दात टीका केली.

 महाराष्ट्र जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत लेखी परवानगी नाही असे सांगत आहे. जी दोन मुल प्रत्यक्षदर्शी होते त्यांना तर सोडून देण्यात आले. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसली आहे. लाज वाटली पाहिजे यांना अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पोलीस ठाण्याबाहेर संताप व्यक्त केला. पोलीस रक्षक आहेत की भक्षक अशी विचारणा करतना चित्रा वाघ यांनी नक्कीच यांच्यावर दबाव आहे असां आरोप केला. पोलीस आमच्याकडे तक्रार नाही असे सांगत आहे. पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका संशयास्पद आहे यांच्याकडून तपास काढून घेतला पाहिजे राजकीय दबावाखाली हे काम करीत आहे. सुओ मोटो अंतर्गत तक्रार का दाखल केली नाही अशी विचारणा केली असता लेखी परवानगी नसल्याचे सांगत आहे. कोणाची चाकरी करत आहेत का? आपला या प्रकाराशी काहीही संबंध नाही असे ते वागत आहे. नक्की कोणाची परवानगी हवी आहे ते स्पष्ट करावं अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. मी माझ्या २२ ते २४ वर्षाच्या समाजकारणात हे पाहिलेले नाही असं चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.

या प्रकरणाचा तपास वानवडी पोलिसांकडून काढून तो सक्षम पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणी चित्रा वाघ पत्रकारांशी बोलातानी केली.

Web Title: Chitra Wagh got angry You should be ashamed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here