Home अहमदनगर ११ वी च्या विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या

११ वी च्या विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या

Shevgaon 11th standard student commits suicide 

शेवगाव | Shevgaon: शेवगाव तालुक्यातील एका १८ वर्षीय ११ वीच्या विद्यार्थ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात ११ कॉमर्स मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या आदेश विजय म्हस्के रा. पवार वस्ती शेवगाव या विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आदेश हा विद्यार्थी गुरुवारी शाळेतून घरी गेल्यानंतर दुपारी मी दोन तीन दिवस शाळेत येणार नाही असे आईस सांगून घराच्या बाहेर पडला. त्यानंतर तो लवकर घरी परतला नाही आईने लक्ष्मीबाई पवार हिने त्याचा शोध घेतला रात्री ११ वाजेच्या सुमारास शेवगाव पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली.

आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयत दुसऱ्या मजल्यावर दोन वर्ग असून एक बंद तर  एका वर्गात ११ वी चा वर्ग भरतो. आज गुरुवारी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे विद्यार्थी वर्गात आले असता काही विद्यार्थ्यांच्या शेजारील वर्गात कोणीतरी स्कार्प च्या सहायाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्राचार्य व शिक्षक यांनी खात्री करून पोलिसांत माहिती दिली. त्यांनतर सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे व पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे हे घटनास्थळी दाखल झाले.   

Web Title: Shevgaon 11th standard student commits suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here