Home अहमदनगर केबल अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

केबल अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

Shirdi Woman dies after falling on cable

शिर्डी | Shirdi: शिर्डी जवळ निमगाव कोऱ्हाळे हद्दीत एका बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात जाळण्यासाठी लाकूड गोळा करत असताना केबलचे रीळ अंगावर पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.

ललिता बाबासाहेब पवार असे या मयत महिलेचे नाव आहे. ललिता पवार यांची घरची परीस्थिती नाजूक होती. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी लाकूड फाटा गोळा करायची. असेच त्या बुधवारी येथील एका बंद असलेल्या हॉटेलमध्ये लाकडाच्या फळ्या गोळा करण्यासाठी गेल्या असता त्याठिकाणी मोठ मोठे केबलचे रीळ ठेवलेले होते. फळ्या गोळा करीत असताना अचानक एक केबलचा रीळ अंगावर पडल्याने त्या दबल्या  गेल्या यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचा आठ वर्षाचा मुलगा सौरभ होता. सौरभने त्यांच्या अंगावरील पडलेला रीळ हटविण्याचा प्रयत्न केला मात्र वजन जास्त असल्याने तो जागेचाही हललेला नाही. घटना समजताच पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वैभव रुपवते व शिर्डी पोलीस पथकाने जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. तेथून त्यांना साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.  

Web Title: Shirdi Woman dies after falling on cable

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here