Home अहमदनगर करोना रुग्णांना डिस्चार्ज करण्याबाबत नवे नियम: राहुल द्विवेदी

करोना रुग्णांना डिस्चार्ज करण्याबाबत नवे नियम: राहुल द्विवेदी

Ahmednagar Corona patient news rules for discharge rahul Dvivedi

अहमदनगर(Ahmednagar): करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. सौम्य, मध्यम आणि गंभीर असे तीन प्रकारावरून त्याच्यावरील उपचार आणि त्यांना घरी सोडण्याबाबत पद्धती निश्चित करण्यात आली आहे. राज्यशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

सौम्य, अतिसौम्य, लक्षणे नसलेल्या करोनाबाधित रुग्णांना सात दिवसानंतर ताप नसल्यास घरी सोडण्यात येणार आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र डिस्चार्जनंतर रुग्णाने सात दिवस होम कोरांटाइन राहणे बंधनकारक राहील. या कालावधीत रुग्णाने स्वतःच्या तब्येतीचे निरीक्षण करावे ताप व श्वसन त्रास होत असल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये संपर्क करावा.

मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णास पॉझिटिव्ह आढळल्यापासून दहा दिवसानंतर ताप नसेल, श्वसनाचा त्रास होत नसेल तर त्यास डिस्चार्ज देण्यात यावा मात्र सात दिवस घरी होम कोरांटाइन राहणे बंधनकारक राहील.

गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचा डिस्चार्ज क्लिनिकल रिकवरी आणि आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर करण्यात यावा.

तपासणी अहवालानुसार करोना बाधित आढळून आल्यास त्या व्यक्तीला कोणत्याही परीस्थिती होम कोरांटाइन राहता येणार नाही. उपचार घेणे बंधनकारक असेल असे आदेशात म्हंटले आहे.     

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar Corona patient news rules for discharge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here