Home अकोले अकोले: ओढ्यावर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

अकोले: ओढ्यावर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Akole Mhaladevi Farmer dies after falling into dug

अकोले(Akole): अकोले तालुक्यातील म्हाळादेवी शिवारातील ठाकरवाडी येथे शनिवारी सकाळी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यासाठी एका ओढ्यावर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या शेतकऱ्याचे नाव चंद्रभान परशुराम हासे वय ६१ रा. म्हाळादेवी असे आहे. या शेतकऱ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे, पोलिसांनी या घटनास्थळाचा पंचनामा व मृतदेहाचा शवविचेदन केला आहे. त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

अकोले पोलिसांत या व्यक्तीची हरविल्याची तक्रार घरच्यांनी दिली होती. ते गेली आठ दहा दिवस घरातून बेपत्ता होते. घरापासून जवळच ३००-४०० मीटर अंतरावर काम बंद असलेल्या कालवे पुलाच्या खड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Mhaladevi Farmer dies after falling into a dug

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here