अहमदनगर जिल्ह्यात २६५४ रुग्णांची वाढ, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २६५४ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर शहरात ४७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नगरबरोबरच कोपरगाव, राहता, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे.
तर अकोले, कर्जत, राहुरी, नगर तालुका, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांमध्ये शंभर पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
अहमदनगर शहर ४७६, राहता २१५, संगमनेर २१९, श्रीरामपूर २००, नेवासे ११४, नगर तालुका १०५, पाथर्डी ११४, अकोले १४५, कोपरगाव २९४, कर्जत १६२, पारनेर ११९, राहुरी १५१, भिंगार शहर ७१, शेवगाव ९२, जामखेड ३३, श्रीगोंदे १२४, इतर जिल्हा १३, मिलिटरी हॉस्पिटल ०७ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात ६५१, खासगी प्रयोगशाळेत ५८२ आणि रॅपिड चाचणीत १४२१ जणांना करोनाची लागण झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Report today 2654