मुख्यमंत्री आज ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार लॉकडाऊनची घोषणा का
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे ठाम मत उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीय व्यक्त केलं. राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत बैठकीत दिले होते. तसेच टास्कफोर्स सोबतच्या बैठकीत कडक लॉकडाऊन करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून समजते.
राज्यात नेमकी कसा असेल लॉकडाऊन? कशा असतील नियमावली? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या राज्यात विकेंड लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू आहेत. त्यालाही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. निर्बंधाचा देखील विरोध व्यापाऱ्यांनी केला आहे. आज रात्री मुख्यमंत्री काय बोलणार हे महत्वाच असणार आहे.
Web Title: Chief Minister Communicate with the public