Home अहमदनगर गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत; तरुणास अटक

गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत; तरुणास अटक

Ahmednagar Crime Captured two live cartridges along with Gawthi Katta

Ahmednagar Crime | श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात विनापरवाना शस्त्रे घेवून फिरत असणाऱ्या एक़ास गुन्हे अन्वेषण नगरच्या पोलीस पथकाने सापळा रचून पकडण्यात आले आहे. पोलिसांनी त्याचेकडून एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रविंद्र घुंगासे. रोहित येमुल, मेघराज कोल्हे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे या अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बीफ मार्केट, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला.

त्यानंतर काही वेळातच एक संशयीत इसम बीफ मार्केट परिसरात फिरत असताना आढळून आला. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली असून ते जप्त करण्यात आले आहे. त्याचे नाव अंजर इलीयाज शहा वय 22, रा. बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं. 2, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र तुकाराम धुगांसे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime Captured two live cartridges along with Gawthi Katta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here