Home अहमदनगर Ahmednagar Crime: सोशल मीडियावर महिलेची बदनामी

Ahmednagar Crime: सोशल मीडियावर महिलेची बदनामी

Ahmednagar Crime Defamation of women on social media

Ahmednagar Crime: अहमदनगर | Parner:  ब्युटी पार्लरचा व्यवसाय करीत असणाऱ्या एका महिलेचे स्टाग्रामवर बनावट खाते  तयार करून बदनामी केल्याची प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी सदर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने फिर्यादी यांच्या नावाचा व फोटोचा वापर करून इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. सदर अकाऊंटवरून फिर्यादीच्या मैत्रिणीला मेसेज करून फिर्यादीची बदनामी केली. हा प्रकार 23 जानेवारी 2022 रोजीच्या पूर्वी घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आपल्या नावे बनावट अकाऊंट असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  अधिक  तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Crime Defamation of women on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here