चंदनापुरी विद्यालयाकडून गुणवंत विद्यार्थी डॉ. विजय रहाणे यांचा सन्मान
संगमनेर | Sangamner: जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे चंदनेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय चंदनापुरी येथील गुणवंत विद्यार्थी डॉ. विजय छबुराव रहाणे यांनी राय युनि्व्हर्सिटी, अहमदाबाद, गुजरात येथून ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयात पी.एच.डी पदवी प्रदान केल्याने विद्यालयाने त्यांचा सन्मान केला आहे.
डॉ. विजय छबुराव रहाणे यांनी ‘अ स्टडी ऑन वेबसाईट ऑफ युनि्व्हर्सिटी लायब्ररीज इन महाराष्ट्र स्टेट’ या विषयावर संशोधन केले. राय युनि्व्हर्सिटीतील संशोधन मार्गदर्शक डॉ. किरीट शुक्ला यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे चंदनेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय चंदनापुरी त्यांचा भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
डॉ. विजय राहणे हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. ते माजी प्राचार्य सी. एल. राहणे यांचे चिरंजीव आहेत. नुकतीच त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयात पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे त्याचे राजकीय, सामाजिक मान्यवर व नातेवाईक, मित्रमंडळीकडून अभिनंदन व सत्कार होत आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री आनंदराव कढणे , रजिस्ट्रार मा. श्री.फटांगरे सर व सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक खेमनर सर, श्री.कैलास रहाणे, श्री.गुंजाळ सर, श्री.वाळे सर, शिक्षक वृंद ,विदयार्थी व ग्रामस्थ मा. श्री. विजय रहाणे मा. उपसरपंच, पोलीस पाटील मा. श्री. ज्ञानदेव रहाणे, श्री. गणेश सातपुते, श्री. संदिप वाकचौरे, डॉ. संदिप रहाणे, श्री. गोरख रहाणे, श्री. गोकुळ रहाणे, श्री. सोमनाथ काळे श्री.अभिषेक कढणे श्री.रवी कढणे, श्री.विनायक रहाणे, श्री.अरुण नेहे, श्री.भाऊसाहेब रहाणे, श्री.रावसाहेब रहाणे, श्री.राजाराम रहाणे, पदमावती रहाणे, अलका रहाणे, तनुष्का रहाणे, विकास रहाणे, कल्पना रहाणे, शारदा रहाणे, शिला रहाणे व शालेय सहकारी उपस्थित होते.
तसेच कॉ. पर्वत मनाजी रहाणे (नाना) ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदनापुरी यांचे वतीने ही गुणवंत सभासद म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुरेश रहाणे सर, डॉ. देवके , मा. श्री. सी एल रहाणे सर , श्री. पंढरीनाथ नामदेव रहाणे, श्री. नानासाहेब रहाणे, श्री.साहेबराव सातपुते, श्री.दादा मार्तंड रहाणे, संचालक मंडळ , सभासद व कर्मचारी तसेच डॉ.विशाल सातपुते, श्री. एम डी रहाणे, श्री. अभिषेक कढणे, श्री.वाळे सिताराम, श्री. मनोज वाळे व ग्रामस्थ उपस्थित राहून अभिनंदन केले.
Web Title: Student from Chandanapuri Vidyalaya, Dr. Honor to Vijay Rahane