अकोले नगरपंचायतच्या सभापतीपदाच्या निवडी जाहीर
अकोले | Akole: अकोले नगरपंचायतच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून सभापती पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. (Election of Akole Nagar Panchayat Chairman announced)
अकोले नगरपंचायतच्या सभापतीपदाच्या निवडी काल बिनविरोध पार पडल्या. आरोग्य व स्वच्छता, वैद्यक समितीच्या सभापतीपदी शरद नवले, पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समितीच्या सभापतीपदी हितेश कुंभार, बांधकाम समितीच्या सभापतीपदी वैष्णवी धुमाळ, तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी प्रतिभा मनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी भाजप एनटी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापतीपदासाठी काल नगरपंचायत सभागृहात पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले
नगरपंचायत सभागृहात सर्व सभापती व स्वीकृत नगरसेवकपदाची निवड प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी काम पाहिले. नूतन सभापती व स्वीकृत सदस्यपदी निवड झालेल्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
Web Title: Election of Akole Nagar Panchayat Chairman announced