Home अहमदनगर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत कोयता आणि चाकूने एकमेकांत तुफान राडा

पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत कोयता आणि चाकूने एकमेकांत तुफान राडा

Ahmednagar Crime front of the police station two groups attacked each other

अहमदनगर | Ahmednagar Crime: नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारातच भांडणाची एकच वेळी फिर्याद देण्यासाठी आलेल्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये कोयता आणि चाकूचा एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

अहमदनगर शहरातील बोल्हेगाव परिसरात गांधीनगर येथे दोन गटांत वाद होऊन भांडणे झाली. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस पथक घटनास्थळी पाठविण्यात आले मात्र तोपर्यंत दोन गट फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात यायला निघाले होते. पोलीस ठाण्यात एकच वेळी दोन्ही गटांचे लोक पोहोचले. एकमेकांना पाहताच पुन्हा हाणामारी सुरु झाली. चाकू आणि कोयता घेत ठाण्याच्या आवारातच हल्ला चढविण्यात आला. एका गाडीच्याही काचा फोडण्यात आल्या. तोफखाना पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जमावात शिरत दोन्ही गटांना बाजूला काढले. यात गणेश कुऱ्हाडे याने सचिन निकम व त्याचा मित्र गणेश पाटोळे याच्यावर चाकू हल्ला केल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात सचिन निकम यांच्या डोक्याला मार लागला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गणेश कुऱ्हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे प्रथमेश चौरे यांच्याविरुद्ध तर दुसऱ्या फिर्यादीवरून सचिन निकम, जयेश पाटोळे व अन्य दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. 

Web Title: Ahmednagar Crime front of the police station two groups attacked each other

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here