Home अहमदनगर अहमदनगरमध्ये या तालुक्यात आरटीओ एजंटचा मृत्यू

अहमदनगरमध्ये या तालुक्यात आरटीओ एजंटचा मृत्यू

RTO agent killed in Ahmednagar

अहमदनगर: श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात विमा आणि आरटीओ प्रतिनिधी म्हणून काम करत असणारे गुलाब रानुजी मोढवे वय ५८ रा. राहुरी यांचा मृतदेह मुळा धरणात आढळून आला. ऑनलाईन पद्धतीने काम चालविले जाणार व आरटीओ बंद होणार असल्याची बातमी त्यांनी कोठेतरी वाचली त्यामुळे ते अस्थ्वास्थ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अशी कोणतीही नोट आढळून आली नाही.

सकाळी सात वाजेच्या दरम्यान पेपर आणण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडले. दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. त्यांचा  मोबाईल बंद दाखवत होता, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी नोंद घेत शोध सुरु होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुळा धरणात वावरथ जांभळी शिवारात पाण्याच्या कडेला एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह गुलाब मोढवे यांचा असल्याचे आढळून आले. मृतदेहाजवळ कोणतीही चिट्ठी आढळून न आल्याने हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत निष्कर्ष काढता आलेला नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: RTO agent killed in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here