Home अहमदनगर विवाहितेवर घरातीलच व्यक्तींकडून विनयभंग, सासरच्यांवर गुन्हा

विवाहितेवर घरातीलच व्यक्तींकडून विनयभंग, सासरच्यांवर गुन्हा

Ahmednagar Crime News Harassment of married women by family members

अहमदनगर | Ahmednagar | Crime News: नगर शहरात धककादायक माहिती समोर आली आहे. दिराने विनयभंग व सासरच्या लोकांनी मारहाण केल्याची फिर्याद विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली असून ही घटना २० नोव्हेंबर रोजी शहरातील एका उपनगरात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सासू सासरे व दीर विरोधात भादंवि 354, 354 (ब), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी फिर्यादी घरामध्ये असताना त्यांचे सासरे लहान मुलाला रागवत असल्याने फिर्यादी त्यांना समजून सांगण्यासाठी गेल्या असता आरोपींनी फिर्यादी विवाहितेला शिवीगाळ केले. फिर्यादी त्यांना समजून सांगण्यासाठी गेल्या असता आरोपी त्यांच्या अंगावर धावून आले. त्यांनी फिर्यादीचे कपडे फाडून विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक नितीन शिंदे करीत आहे.

Web Ttile: Ahmednagar Crime News Harassment of married women by family members

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here