Home Suicide News Suicide: जिल्ह्यातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: जिल्ह्यातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide by strangulation of a farmer in Parner

पारनेर l Suicide:  पारनेर तालुक्यातील गुणोरे गावातील ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेतामधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  निघोज दुरक्षेत्राचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला आहे.

दत्तात्रेय किसन खोसे (वय ४५ रा. गुणौरे, ता. पारनेर) असे आत्महत्या केलेल्या शेतकयाचे नाव आहे. शेतकरी असलेले दत्तात्रेय हे पिक अप चालक म्हणूनही काम करीत होते

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे दत्तात्रेय किसन खोसे यांनी त्यांच्या गुणौरे येथील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुणोरे परीसरातील शेतीसाठी पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा सुरु आहे. खोसे यांच्या घराशेजारील शेतकरी सकाळी कांद्याला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले असता लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दत्तात्रेय त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्यांनी दत्तात्रेय खोसे यांचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांना माहीती दिल्याने घटनास्थळी नागरीक जमले. याबाबत पोलिसांना माहीती देण्यात आल्यानंतर निघोज दुरक्षेत्राचे पोलिसही तेथे दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. दत्तात्रेय यांनी आत्महत्या का केली असावी? याविषयी तर्क वितर्क लढविले जात आहेत

Web Title: Suicide by strangulation of a farmer in Parner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here