Home महाराष्ट्र नाशिक-पुणे मार्गाबाबत गडकरींची मोठी घोषणा

नाशिक-पुणे मार्गाबाबत गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari tweet regarding nashik pune highway

Nitin Gadkari tweet regarding nashik pune highway: रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक-पुणे महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. नाशिक फाटा ते खेड(राजगुरुनगर) या दरम्यानच्या महामार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी टि्वट करुन दिली आहे. यामुळे आता प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला चालना मिळणार आहे.

नाशिक-पुणे महामार्गाचे काम हे विविध टप्प्यांमध्ये केले जात आहे. त्यातील नाशिक फाटा ते खेड (राजगुरुनगर) या दरम्यानच्या महामार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंत वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. यामुळे ४० ते ४५ किमीच्या या मार्गासाठी दोन-तीन तास लागतात. आता या मार्गाचा विस्तार होणार असल्यामुळे हा वेळ निम्यावर येणार आहे.

Nitin Gadakari Tweet: Draft notification sanctioned for the entrustment of Nashik Phata (Pune, Maharashtra) to Khed section of new NH-60 (Old NH-50) under section 11 of NHAI act, 1988 after withdrawing the same from state PWD.

Web Title: Nitin Gadkari tweet regarding nashik pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here