Home अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांची बॅग गहाळ केल्याप्रकरणी संगमनेरातील एकावर गुन्हा  

जिल्हा शल्य चिकित्सक यांची बॅग गहाळ केल्याप्रकरणी संगमनेरातील एकावर गुन्हा  

Ahmednagar Crime News on one of Sangamner for missing bag

अहमदनगर |Crime News| Ahmednagar:  जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी त्यांच्या पत्नीला देण्यासाठी दिलेल्या वस्तूची बॅग कर्मचार्‍यांकडून गहाळ केल्याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संजय गंगाधर वाकचौरे (रा. चंदनापुरी ता. संगमनेर) याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके यांच्या पत्नी कल्पना भूषणकुमार रामटेके (वय 43 रा. जिल्हा रुग्णालय परिसर, मुळ रा. सिडको, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

20 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके यांनी कर्मचारी वाकचौरे याच्याकडे एक बॅग दिली होती. या बॅगेत आठ हजार रुपयाची रोख रक्कम, चार पेनड्राईव्ह, दोन एटीएम कार्ड होते. सदर बॅग डॉ. रामटेके यांच्या पत्नी कल्पना यांच्याकडे सिडको, औरंगाबाद येथे देण्यास सांगितले होते.

कर्मचारी संजय गंगाधर वाकचौरेयाने या वस्तू असलेली बॅग कल्पना रामटेके यांना दिली नाही. ही बाब डॉ. रामटेके यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वाकचौरे याच्याकडे चौकशी केली असता चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे गुरूवारी वाकचौरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार डी. बी. जपे करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime News on one of Sangamner for missing bag

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here