Home अहमदनगर अनैसर्गिक कृत्य चित्रीकरण, चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी

अनैसर्गिक कृत्य चित्रीकरण, चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी

Ahmednagar Crime Unnatural acts filmed, threatening ransom 

अहमदनगर | Ahmednagar Crime: रिक्षा चालक तरूणाबरोबर अनैसर्गिक कृत्य करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण व्हायरल करून देण्याची धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. नगर शहरात ही घटना घडली असून तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, जबरी चोरी, धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द सय्यद अझर नवाजुद्दीन (वय 24), शेख अरबाज हारून (वय 22 दोघे रा. मुकुंदनगर, अहमदनगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी दुपारी एक ते गुरूवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात ही घटना घडली. सय्यद अझर नवाजुद्दीन व एक अनोळखी व्यक्तीने रिक्षा चालक तरुणाला मारहाण केली. त्याला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. या सर्व घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तसेच सदर चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत रिक्षा चालक तरुणाच्या खिशातील 850 रुपये बळजबरीने काढून घेतले. यानंतरही त्याला वारंवार फोन करून चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे एक हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Crime Unnatural acts filmed, threatening ransom 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here