अकोलेतील घटना: मुलानेच केली बापाची हत्या, पोटास दगड बांधून विहिरीत टाकले
Akole Crime | अकोले: अकोले तालुक्यातील वारांघुशी गावात मुलानेच आपल्या बापाची हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच राजूर पोलिसांनी दोन तासांतच आरोपीला अटक केली आहे.
रामदास लक्षमण घाणे वय ५५ रा. वारांघुशी ता. अकोले हत्या झालेल्या पित्याचे नाव आहे. मयत रामदास लक्षमण घाणे यांचा मुलगा काळू रामदास घाणे यांच्या घरातील तीन शेळ्या व दोन बोकड विकले होते. या कारणावरून बाप लेकांत १९ फेब्रुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भांडण झाले. यात आरोपी काळू घाणे याने वडील मयत रामदास यास काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले होते. यानंतर त्याच्या पोटाला दगड बांधून शेतातल्या विहरीत टाकून आरोपी हा फरार झाला होता.
दरम्यान मयत रामदास यांचा मोठा मुलगा राजू याने राजूर पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उप निरीक्षक नितीन खैरनार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता पोटास दगड होता. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Akole Crime father murder his own son