Home अहमदनगर पोलीस प्रशासनाने सकल मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : मागणी

पोलीस प्रशासनाने सकल मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : मागणी

पोलीस प्रशासनाने सकल मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : मागणी

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलने करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून हे गुन्हे पोलीस प्रशासनाने मागे घ्यावेत, अशी मागणी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

याबाबत कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दि. २७ जुलै शुक्रवारी निवेदन दिले. प्रशासनाला पूर्व कल्पना देऊन नगर शहरात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यानही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यात आले. दोन वर्षांपासून शांततेच्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत़ राज्यात समाजाच्यावतीने ५६ मूकमोर्चे काढण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र काही समाजकंटकांकडून मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी दगडफेक, वाहनांची तोडफोड होत असेल तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. नगर शहरातील कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन केले आहे. तरी पोलिसांनी काही तरूणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारांना सकल मराठा समाज पाठीशी घालणार नाही.

पोलीस प्रशासनाने निरापराध तरूणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत़ अन्यथा शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

Fashion Ad

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here