Home संगमनेर संगमनेर: महिलेच्या पर्समधून चोरट्याने लांबविले २० हजार रुपये

संगमनेर: महिलेच्या पर्समधून चोरट्याने लांबविले २० हजार रुपये

संगमनेर: महिलेच्या पर्समधून चोरट्याने लांबविले २० हजार रुपये

संगमनेर: एस.टी. बसमधून खाली उतरत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने २० हजार लांबविले असल्याची घटना संगमनेर बसस्थानक याठिकाणी शुक्रवार दि. २७ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहिणी काकासाहेब क्षीरसागर (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) ही महिला संगमनेर बस स्थानक याठिकाणी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आली होती. ती अकोले कडे जाणाऱ्या एस.टी.बस लांबच्या मार्गे अकोल्याला जाते असे समजले त्यामुळे ती महिला बसमधून खाली उतरत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळेतील पर्समधून रोख रक्कम २० हजार रुपये चोरून पोबारा केला. बसमधून खाली उतरल्यानंतर महिलेने पर्स मध्ये पहिले असता २० हजार रुपये नव्हते. त्यामळे या महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.  

Fashion Ad


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here