Home महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी गरज पडल्यास घटना दुरुस्ती करा – शरद पवार

मराठा आरक्षणासाठी गरज पडल्यास घटना दुरुस्ती करा – शरद पवार

मराठा आरक्षणासाठी गरज पडल्यास घटना दुरुस्ती करा – शरद पवार

कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करणे शक्य आहे. घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी भूमिका राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. घटना दुरुस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावली होती. त्याआधी पत्रकारांशी बोलताना अशी भूमिका घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी वारीत साप सोडण्यासंदर्भात जे वक्तव्य केले त्यामुळेच मराठा समाजातील आंदोलक अधिक आक्रमक झाले. आंदोलन शांततेत सुरु असतांना सत्ताधार्यांनी बेजबाबदार वक्तव्य करून आगीत तेल ओतले अशी टीका शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर सोडवावा. राज्यात निर्माण झालेली परिस्थिती राज्याच्या हिताची नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने तयारी दर्शवली तर विरोधकांना मी त्याची गरज समजावून सांगेन अशी भूमिका पवारांनी घेतली आहे. तसेच सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावे असे आव्हानही शरद पवार यांनी दिले आहे.  

Fashion Ad

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here