Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ३३८८ रुग्णांना डिस्चार्ज मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

अहमदनगर जिल्ह्यात ३३८८ रुग्णांना डिस्चार्ज मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

Ahmednagar Discharge of 3388 patients but death rate is alarming

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी ३३८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ६८६ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८६.७६ टक्के इतके झाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१२३ रुग्ण नव्याने आढळून आले आहे.  सध्या रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या सध्या २२ हजार ३९० इतकी झाली आहे.

कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु दुसरीकडे मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक झाले आहे. रविवारी सायंकाळी ते सोमवारी सायंकाळपर्यंत २४ तासांत ५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सोमवारी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांत मनपा ८९२,अकोले ४१, जामखेड १५३, कर्जत २०४, कोपरगाव १३१, नगर ग्रामीण ३३७, नेवासा १४०, पारनेर १५७, पाथर्डी ९८, राहता ३९८, राहुरी १५१, संगमनेर १२१, शेवगाव २०६, श्रीगोंदा ११२, श्रीरामपूर १११, कॅन्टोन्मेंट १३ असे रुग्ण बरे झाले आहेत.

Web Title: Ahmednagar Discharge of 3388 patients but death rate is alarming

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here