Home अहमदनगर विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी दोघांजणांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी दोघांजणांवर गुन्हा दाखल

Crime connection with the suicide of a married woman

शिर्डी | Crime: शिर्डीमध्ये एका विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिडी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता सोमनाथ गायकवाड असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती सोमनाथ मल्हारी गायकवाड वय ४२ रा. नादुरखी याने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी विनायक सोपानराव चौधरी रा. नांदूरखी व रिक्षा चालक रवी पवार रा. शिर्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सविता सोमनाथ गायकवाड ही पती व दोन मुलींसह चौधरी वस्ती येथे तीन वर्षापासून राहते.

चौधरी याने मुलगी बेपत्ता आहे अशी तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. ती पळून जात असताना या प्रकरणात सविता गायकवाड हिच्या मोबाईलचा वापर केला गेला होता असे पोलीस तपासात उघड झाले होते.

या आरोपावरून सविता सोमनाथ गायकवाड या महिलेला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याने सविता गायकवाड हिने राहता प्रवास करीत असताना रोगार नावाचे विष प्राशन करून आत्महत्या केली. पतीच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी उप विभागीय अधिकारी राहुल मदने हे करीत आहे.

Web Title: Crime connection with the suicide of a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here