Home अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांड: चौघांना जामीन मंजूर

जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांड: चौघांना जामीन मंजूर

Ahmednagar District hospital fire Bail granted to four

अहमदनगर | Ahmednagar : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्निकांड  या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंता या चौघींना जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी जामीन मंजूर केला आहे.

दिनांक 6 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौघींना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आरोपींच्या वतीने ऍड. महेश तवले, ऍड. विक्रम शिंदे, ऍड. नीलेश देशमुख आणि ऍड. संजय दुशिंग यांनी युक्‍तीवाद केला.

दिल्ली येथील चित्रपट गृहास लागलेल्या आगीत सुमारे शंभर प्रेक्षकांचा मृत्यू झाला होता. कर्नल पुरोहित प्रकरण आदी महत्वाचे न्यायनिवाडे सादर केले होते. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरले. डॉ. शिंदेंसह तीन परिचारिकांना जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने त्यांच्यावर चार अटी लादल्या आहेत.

प्रत्येकी 25 हजार रुपयांची सॉलन्शी किंवा दोन जामीनदार.

जिल्हा बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्‍यक कारणांसाठी जिल्ह्या बाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी.

साक्षीदारांवर दबाव आणू नये.

या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना तपासात मदत करणे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Ahmednagar District hospital fire Bail granted to four

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here