Home अहमदनगर रेशन तांदळाचा काळाबाजार: दोघांवर गुन्हा दाखल

रेशन तांदळाचा काळाबाजार: दोघांवर गुन्हा दाखल

Shrigonda Black market of ration rice Crime filed against both

श्रीगोंदा | Ahmednagar: तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेला रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा टेम्पोवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी १ लाख ७६ हजार ३६७ रुपयांचा ५ हजार ८७८ किलो रेशनचा तांदूळ तसेच ७ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ८ लाख ७६ हजार ३६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांनी याबाबत फिर्याद दिली असून फिर्यादीवरून टेम्पो मालक महावीर वसंतलाल गांधी (रा.पारगाव सुद्रिक) आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गांधी यांच्या मालकीच्या टेम्पोत रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेवून जाणार असल्याची गुप्त माहिती माहिती मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार या रस्त्याने जाणाऱ्या आयशर (एम.एच.१२.एच.डी. २७२७) या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने टेम्पो काही अंतरावर नेऊन पारगाव वडाळी काळे यांच्या गोडावुनच्या शेजारी उभा करून तो पळून गेला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी टेम्पोची पहाणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या गोण्यांत तांदुळ आढळुन आला. हा तांदुळ रेशनचा असल्याचा संशय आल्याने तसेच टेम्पो चालक पळून गेल्याने पोकॉ.प्रताप देवकाते, दादासाहेब टाके यांच्या हा टेम्पो पोलिस ठाण्यात आणला. पुरवठा अधिकारी सुनिल पाचारणे यांनी पंचनामा करत हा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात टेम्पो मालक महावीर गांधी आणि चालक यांच्यावर गुन्हा (crime filed)दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Shrigonda Black market of ration rice Crime filed against both

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here