Home अहमदनगर अवकाळी पावसाचा तडाखा: संगमनेर तालुक्यात २६ तर पारनेर तालुक्यात शेकडोहून अधिक मेंढ्या...

अवकाळी पावसाचा तडाखा: संगमनेर तालुक्यात २६ तर पारनेर तालुक्यात शेकडोहून अधिक मेंढ्या दगावल्या

Ahmednagar District onset of unseasonal rains

अहमदनगर | Ahmednagar: नगर जिल्ह्यात अवकाळी पाउस आणि वाढलेल्या गारठ्याचा फटका मेंढपाळ यांना चांगलाच बसला आहे. पारनेर व संगमनेर (Sangamner Taluka) तालुक्यात शेकडोहून अधिक मेंद्या दगावल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील मेंढपाळ अडचणीत सापडले आहे. प्रशासन पंचनामे करीत आहे. अद्याप मृत्यूची संपूर्ण आकडेवारी समोर आली नाही.

संगमनेर तालुक्यात २६ मेंढ्यांचा अवकाळी पाउस व गारठ्याने २६ मेंद्यांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील साकुरसह इतरही भागातील हे मेंढपाळ कुटुंब पुणे जिल्ह्यात मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. पुन्हा गावाकडे परतत असताना ते नांदूर खंदरमाळ परिसरात मुक्कामी थांबले होते. पावसामुळे पडलेल्या प्रचंड गारठ्याचा फटका या सात मेंढपाळ कुटुंबांना बसला असून काल मध्यरात्री कडाक्याच्या थंडीने त्यांच्या २६ हून अधिक मेंढ्या मृत्यूमुखी पावल्या आहेत. या मेंढपाळांनी शासनाकडे नुकसान भरपाई व मदतीची मागणी केली आहे. घटनेची माहिती समजताच तलाठी युवराजसिंग जारवाल, गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पारनेर (Parner taluka) तालुक्यात अवकाळी पाऊस आणि सोबतच थंडी आहे. त्याचा फटका मेंढ्यांना बसला. पाऊस आणि गारठा सहन झालेल्या मेंढ्यांचा ठिकठिकाणी मृत्यू झाला. अद्याप याची नेमकी आकडेवारी हाती आली नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार पाचशेच्या आसपास मेंढ्या दगावल्याचे मेंढपाळांकडून सांगण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील रांधे, पाडळी आळे, पळवे, पोखरी, वारणवाडी, पठारवाडी, कुरुंद, म्हसोबाझाप, खडकवाडी, वनकुटे, चोंभूत, शिरापूर, कातळवेढा, तिरकळ मळा, पुणेवाडी, पुणेवाडी फाटा, सोबलेवाडी, किन्ही, कान्हूर पठार, कळमकरवाडी, पाडळी रांजणगाव, निघोज तसेच नगर तालुक्यातील पिंपरी विळद, मावळेवाडी या गावांना फटका बसला आहे. आमदार निलेश लंके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून शासकीय मदतीची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेंढपाळांनी शासनाकडे नुकसान भरपाई व मदतीची मागणी केली आहे.

Web Title: Ahmednagar District onset of unseasonal rains

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here