Home अकोले अकोले आदिवासी भागातील भात पिकांचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक...

अकोले आदिवासी भागातील भात पिकांचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा

Ahmednagar Akole Provide immediate financial assistance to the affected farmers 

भात उत्पादक शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अकोले | Ahmednagar:  गेली दोन ते तीन दिवसाासून तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे या अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वत्र भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे  आढळा विभाग ,प्रवरा विभाग, आणि मुळा विभागातील कांदा पीक, तसेच गहू हरभरा , मका , या सहित आदी पिकांचे नुकसान झाले आहे तर आदिवासी भागातील मुख्य पीक समजल्या जाणाऱ्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील भात उत्पादक शेतकरी देशो धडीला लागला आहे.

सध्या भात कपणीचा हंगाम सुरू आहे मोठ्या प्रमाणात या आदिवासी दुर्गम भागात भात कापणी सुरू आहे मात्र अकोले तालुक्यासह वरच्या आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील कापलेली भाते तसेच शेतात उभे असलेली भात पिके पूर्ण पणे वाया गेली आहे. अवकाळी पाऊस झाल्या झाल्या तातडीने या पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे होणे गरजेचे होते त्या बाबतीमध्ये समशेरपूर गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच शिव सेना नेते श्री बाजीराव दराडे आणि या गटातील विद्यमान सदस्या सौ सुषमा ताई दराडे यांनी पंचनामे होण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना सूचना केल्या होत्या मात्र कृषी विभागाकडून या शेती पिकांचे पंचनामे करण्यासाठी उशिर झाल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे झालेले नाही त्या अनुषगाने आज चीचोंडी, वाकी, मान्हेरे, लाडगाव, देवगाव, कोकणवाडी, बितका , पाडोशी, एकदरे, पेढेवाडी, या भागातील सरपंच उपसरपंच यांनी  या भागातील भात शेती पिकांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा या मागणी साठी श्री बाजीराव दराडे सौ, सुषमा ताई दराडे यांच्या मार्गदर्शाखाली तसेच माजी उपसभापती श्री मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली आज  या आदिवासी  भागातील सरपंच उपसरपंच यांच्या शिष्मंडळाने  अकोले तहसिलदार यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

नुकसान ग्रस्त भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत न केल्यास मोठ्या प्रमाणात भात उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करून उग्र  स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बाजीराव दराडे यांनी दिला आहे.

या प्रसंगी तहसीलदार यांना भात उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देताना माजी उपसभापती श्री मारुती मेंगाळ, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पथवे, सचिव श्री बाळासाहेब मधे श्री सुरेश गभाले , श्री गभाले गुरुजी, श्री मारुती सोमा मेंगाळ, श्री बाळू दगळे, श्री गोरख भांगरे, श्री पोपट मेंगाळ, श्री मधुकर मेंगाळ, श्री किरण पेढेकर, श्री नंदू खोकले, श्री प्रकाश कुलाळ, श्री गुलाब भांगरे या सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Ahmednagar Akole Provide immediate financial assistance to the affected farmers 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here