Home अकोले संगमनेर अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत रिक्त १२५ जागांसाठी पोटनिवडणूक

संगमनेर अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत रिक्त १२५ जागांसाठी पोटनिवडणूक

Sangamner Akole election for 125 vacant Gram Panchayat seats

संगमनेर | अकोले: जिल्हयातील पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निधन, राजीनामा, अनर्हता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्हयातील पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

21 डिसेंबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. संगमनेर विभागातील संगमनेर व अकोले तालुक्यातील 68 ग्रामपंचायती मधील 125 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. अशी माहिती संगमनेर उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अकोले तालुक्यातील घोडसरवाडी, इंदोरी, धामणगावपाट, कळंब, लिंगदेव, भोळेवाडी, जायकवाडी, देवगांव, साकीरवाडी, घाटघर, भंडारदरा, जहागीरदरावाडी, शेंडी, बारी, साम्रद, मुतखेल, गुहिरे, शिसवद, कुमशेत, पाचनई,अंबीत, पेंडशेत, शिंगनवाडी, पैठण, वाडी, रेडे, पिंपळगांव नाकविंदा, दिगंबर, आंबेवंगण, शेलविहिरे, जायनावाडी बिताका, एकदरे, लाडगाव, कोकणवाडी, पाचपट्टावाडी, खडकी खु., शिळवंडी, घोटी, कोहने, सोमलवाडी, पेडेवाडी, चंदगीरवाडी, पिंपळदरावाडी, पिंपळगांव निपाणी, ब्राम्हणवाडा, शेरनखेल, चैतन्यपूर, कौठवाडी, मन्याळे, मुराशेत, तीरडे, वीरगाव अशा एकूण 52 ग्रामपंचायतमधील 106 सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत.

संगमनेर तालुक्यातील आश्वी, बोरबन, खराडी, कोंचिमांथी, कुरकुटवाडी, म्हसवंडी, मिरपूर, निमगांव जाळी, निमगांव टेंभी, पळसखेडे, समनापूर, वडगांव लांडगा, मिर्झापूर, चिंचपूर, काकडवाडी, ओझरखर्द अशा एकूण 16 ग्रामपंचायतमधील 19 सदस्यांच्या जा

निवडणूक कार्यक्रम उमेदवारी

अर्ज भरणे – ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर,

अर्ज छाननी – ७ डिसेंबर

अर्ज माघार/ चिन्ह वाटप ९ डिसेंबर

मतदान – २१ डिसेंबर

मतमोजणी – २२ डिसेंबरगांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत.

ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पध्दतीने (OFF LINE) राबविण्यात येणार आहे अशी माहिती ही श्री.मंगरूळे यांनी दिली आहे.

Web Title: Sangamner Akole election for 125 vacant Gram Panchayat seats

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here